Advertisement

पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना जागरूकतेचा संदेश


पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना जागरूकतेचा संदेश

“कन्हान युथ फाउंडेशनचे पथनाट्य अभियान - ५० ठिकाणी जनजागृती”

 “मुलभूत सुविधांवरील प्रश्न नाटकातून मांडले, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”

कन्हान : - कन्हान युथ फाउंडेशन तर्फे शहरातील दहा प्रभागांमध्ये आयोजित तीन दिवसीय पथनाट्य जागर अभियानाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

मंगळवार (दि.१४) ऑक्टोंबर पासून गुरुवार (दि.१६) ऑक्टोंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात आले . गांधी चौक येथून पथनाट्य अभियानाचा शुभारंभ झाला . त्यानंतर तारसा चौक , आंबेडकर चौक , शहीद चौक , सात नंबर नाका , रायनगर , धरमनगर , पिपरी , स्वामी विवेकानंद नगर , राधाकृष्णन नगर , तुकाराम नगर , रामनगर , सुपरटाऊन , हनुमान नगर , शिवनगर , इंदिरानगर , आनंद नगर , सत्रापुर , सिहोरा आदी भागात पथनाट्य सादर करण्यात आले .

शहरातील नागरिकांना दररोज भेडसावणाऱ्या मुलभूत सुविधांच्या समस्यांवर कलाकारांनी प्रभावी नाट्यरूपातून प्रकाश टाकला . बसस्टँड , आठवडी व गुजरी बाजारासाठी सुरक्षित जागेचा अभाव , श्मशानभूमी नसणे , फिल्टर पाण्याची अपुरी व्यवस्था , महामार्गावर सार्वजनिक शौचालयांचा अभाव , तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचा अभाव अशा ज्वलंत मुद्द्यांवर आधारित पथनाट्यांनी नागरिकांना जागृत केले . सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही सत्रांत शहर भर अभियान राबविण्यात आले . नागरिकांनी नाटके मोठ्या उत्साहाने पाहत समस्यांवर आपली प्रतिक्रिया दिली . या अभियानात कन्हान युथ फाउंडेशनचे संयोजक कैप्टन सतीश बेलसरे , डॉ. कमलेश शर्मा , देविदास तडस , सूर्यभान फरकाडे , शैलेश झेंडे , गणेश रामापुरे , हरीश पोटभरे , पुरुषोत्तम बेले , ऋषभ बावनकर , प्रशांत बावनकुळे , संतोष पाली , दिगंबर हारगुडे आदी सदस्य उपस्थित होते .


कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या